स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १४ / ५ / २० २३) :

भिमा सहकारी साखर कारखान्याने ज्या ऊस उत्पादकांनी दि. १ डिसेंबर २०२२ पासून पुढे आपला ऊस गाळपस दिला आहे, त्यांना गेल्या सहा महिन्यापासून एकही रुपये ऊस बिल न दिल्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यांना दिलासा व न्याय मिळावा म्हणून शेतकरी संघर्ष समितीने बुधवार दि. १७ मे २०२३ रोजी निरा भीमा सहकारी साखर कारखान्यावर आत्मक्लेष पदयात्रा काढण्याचा ठाम निर्णय घेतला असल्याची माहिती आंदोलनाचे प्रमुख नेते अप्पासाहेब जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. इंदापूर शहरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार सभागृहात सोमवार दि. १५ में रोजी, पत्रकार परिषदेच्या आयोजन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील, कार्याध्यक्ष महादेव घाडगे, उपाध्यक्ष अजित टिळेकर, माजी सभापती
प्रशांत पाटील, विजय घोगरे, अभिजीत घोगरे, तुकाराम घोगरे, सचिव विजय गायकवाड, सुरेश शिंदे यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी आप्पासाहेब जगदाळे बोलत होते. पुढे बोलताना आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, आत्मक्लेस पदयात्रेचे आंदोलन कोणत्याही एका व्यक्तीच्या अथवा राजकीय पक्षाच्या विरोधी नसून यात कोणतेही राजकीय पक्ष आणलेला नाही. फक्त ऊस बिलामुळे हतबल झालेल्या आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन सर्व शेतकऱ्यांनी आयोजन केले आहे.

त्यामुळे यामध्ये शेतकरी साखर कारखाना कामगार यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तरच तुम्हाला न्याय मिळेल. असेही आप्पासाहेब जगदाळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील म्हणाले की, आम्ही १० मे रोजी निरा भीमा सहकारी साखर कारखाना प्रशासनास निवेदन दिल्यानंतर कारखान्याचे संचालक खडबडून जागे झाले. संचालकांनी बैठक घेऊन पाच जून पर्यंत देण्याचा निर्णय घोषित केला. पूर्ण देण्याऐवजी बिलापोटी थोडीशी रक्कम उचल देण्याचा हा प्रकार
असून आतून लोकांच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत. शेतकऱ्यांनी मागील दोन वर्ष सांभाळलेला ऊस हर्षवर्धन पाटील यांच्या निराभिमा सहकारी साखर कारखान्याला दिला. शेतकरी आता आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही. .

– – – – – – – – – – – – –
चौकट : -निरा भिमा उभा करण्यासाठी आम्ही कष्ट केलेइंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल, शेतकऱ्यांच्या उसाला हमीभाव मिळेल, म्हणून आम्ही निराभिमा सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी सहकार्य केले. त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांच्या . . . कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक वाढवण्याचे काम केले. आम्हांला असे वाटत होते की, निरा भिमा सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला हमीभाव देऊन त्यांना न्याय देईल. मात्र ते कारखाना चालवणारे त्यांचे बॉस यांनी हा कारखाना डबघाईला का आला ? त्याचा विचार करावा. नेमका कारखाना अडचणीत आला कसा ? असा सवाल प्रशांतराव पाटील यांनी केला.