स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १० / ५ / २० २३) :

दिनाक ०४ मे रोजी रात्री १.४५ वा ते २.२० वा चे दरम्यान मौजे कालठनं नं. २ ता. इंदापुर जि.पुणे गावच्या हद्दीत ५ अनोळखी इसमांनी तक्रारदार नवनाथ मेटकरी यांच्या घरात घुसुन कोयत्याचा धाक दाखवुन तसेच मारहाण करून विवो कंपनीचे दोन मोबाईल तसेच सागर नामदेव रेडके यांच्या घराच्या रूमचे कुलुप तोडुन घरातील कपाटातील सोन्याचे दागीने चोरुन नेले होते.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी तात्काळ गुन्हयाच्या घटनास्थळी भेट देवून गुन्हे शोध पथकास तपासाबाबत मार्गदर्शक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याची जबाबदारी दिली होती.
त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे १) शुभम उर्फ दिलशार अशोक पवार (वय २२ वर्षे रा. दुधवडी, ता. कर्जत जि. अहमदनगर), २) उमेश अनिल काळे (वय १९ वर्षे. मुळ रा. लोखंडेवस्ती, कटफळ, ता. बारामती.जि.पुणे), ३) आदेश अनिल काळे (वय १९ वर्षे, रा. लोखंडेवस्ती, कटफळ, ता. बारामती. जि.पुणे) व एक विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेवून त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून आणखी कालठण नं.२ येथे यापुर्वी केलेल्या दोन तसेच वडापूरी ता. इंदापूर येथील घरफोडीचा असे एकुण ४ गुन्हे उघडकीस आलेले आहे. अद्या पर्यंत ३ आरोपींना अटक करण्यात आलेली असून एक आरोपी फरार आहे. अटक आरोपीत यांच्याकडून त्यांनी चोरी केलेले ५ लाख रूपये किंमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व ३ मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामिण अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे , उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, प्रकाश पवार, स.पो. भरत जाधव, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश माने, शुंभागी खंडागळे, पोलीस नाईक संजय मल्हारे, सलमान खान, पोलीस कॉन्टेबल नंदू जाधव, गजानन वानूळे, विनोद लोंखडे, लक्ष्मण सुर्यवशी, गजेंद्र बिरलिंगे, अमोल खाडे, होमगार्ड संग्राम माने यांनी केली .
