स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ६ मे) :


इंदापूर तालुक्यातील कालठण नं. २ येथे ही घटना घडली. बुधवारी (४ मे) मध्यरात्री १२ ते २ वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या सशस्त्र दरोड्यात अज्ञात दरोडेखोरांनी मोबाईल आणि सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल लुबाडून पोबारा केला. या संदर्भात सागर नामदेव रेडके (रा. कालठण नं. २, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलीस ठाण्यात चार अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या घरानजीक असणाऱ्या नवनाथ मेटकरी यांच्या घरावर प्रथम दरोडा टाकत दरोडेखोरांनी कोयत्याच्या धाकाने, तसेच नवनाथ
मेटकरी यांना लाथा बुक्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील विवो कंपनीचे २० हजार रु. किमतीचे दोन मोबाईल हिसकावून नेले. दरम्यान या घटनेनंतर मेटकरी यांनी मदतीसाठी बोलाविल्याने फिर्यादी सागर रेडके हे मेटकरी यांच्यासह आसपासच्या परिसरात दरोडेखोरांचा शोध घेत होते. मात्र हे शोधकार्य सुरू असताना दरोडेखोरांनी फिर्यादी यांच्याच घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात असणारे तब्बल ४ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. या घटनेचा पुढील तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे करीत आहेत.