स्टार केबी न्यूज इंदापूर ( ५ मे २०२३) :-

इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे, मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात जगाला सुख, शांतीचा संदेश देणाऱ्या सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्धांची २५६७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
निसर्गात घडणाऱ्या घटनांचे शास्त्रीय विश्लेषण करणारा जगातील पहिला महामानव म्हणजे बुद्ध होय. बुद्धाला जगातील सर्वोत्कृष्ट महामानव मानले जाते.
त्या महामानवाची अर्थात तथागत बुद्धांची जयंती प्रशालेत आनंदात साजरी करण्यात आली.
यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा आयु.शकुंतला मखरे , सचिव ॲड.समीर मखरे यांच्या हस्ते तथागत बुद्धांच्या मूर्तीस पुष्प, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
तसेच कार्यक्रमस्थळी उपस्थितांच्या वतीने सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
बुद्ध पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्मदिन, गौतम बुद्धांना बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली,तो दिवस आणि गौतम बुद्धांचा निर्वाण दिन या तिन्ही घटना वेगवेगळ्या वर्षी पण वैशाख पौर्णिमेला घडल्या असे सांगतात. याच कारणामुळे वैशाख पौर्णिमा विशेष महत्त्वाची आहे.
यावेळी सचिन बेसरे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे तसेच सर्व प्राध्यापक,अधीक्षक, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.
