स्टार केबी न्यूज
संपादक : काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १२ / १२ / २० २ २ ) :

औरंगाबाद येथील कार्यक्रमात राज्य सरकारमधील जबाबदार मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी लोकांकडे भीक मागितली तसेच शाळा सुरू करण्या करिता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता.? असे बेताल व बदनामीकारक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.त्यामुळे समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्य आहेत या वक्तव्याच्या निषेध करावा तेवढा थोडाच आहे याच कारणासाठी इंदापूर शहरातील,तालुक्यातील शाहू,फुले,आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आज दिनांक १२ डिसेंबर रोजी इंदापूर पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांना उद्या मंगळवार दिनांक १३ डिसेंबर रोजी इंदापूर बंदचे लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड येथे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर काळी शाई फेकली. सत्तेचा गैरवापर करून या मनुवादी सरकारने संबंधित कार्यकर्ते व पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ते खोटे गुन्हे मागे घ्यावेत तसेच बहुजन समाजाच्या भावनांचा आदर करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी आपल्या मार्फत राज्य सरकारकडे करीत असल्याचे नमूद केले आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ व चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही फेकलेल्या कार्यकर्त्यावर जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत या घटनेच्या निषेधार्थ उद्या दिनांक मंगळवार (दि.१३ डिसेंबर ) रोजी समस्त शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने इंदापूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. सदरचा बंद निर्विघ्नपणे पार पाडणे बाबत पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर सुरज धाइंजे (बहुजन क्रांती मोर्चा इंदापूर तालुका),एडवोकेट सुरज हनुमंत मखरे (इंडियन लॉयर असोशियन), एडवोकेट बापूसाहेब साबळे, दया मखरे ,गोरख साहेबराव भोसले, वसीम नजीर शेख, ज्ञानदेव लाला जाधव, नानासाहेब सुभाष चव्हाण, शितल पलंगे, अजय गौतम मखरे, महेश दशरथ सरवदे, हनुमंत कांबळे( सचिव पुणे जिल्हा वंचित बहुजन आघाडी मनीषाताई चंदनशिवे (महिला तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी), सिद्धार्थ साळवी,पवन पवार, इत्यादींच्या सह्या आहेत.
निवेदनाच्या प्रती तहसीलदार इंदापूर यांना देण्यात आले आहे.