स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे
इंदापूर ( दि.26/4/23 ) :

फोटो :- इंदापूर येथे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मोहिते पाटील साखर कारखान्याच्या बिनविरोध निवड झाल्या संचालकांचा सत्कार करण्यात आला.

_______________________________
भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते अकलूजच्या सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये इंदापूर तालुक्यातील बिनविरोध निवडून आलेल्या 3 संचालकांचा इंदापूर येथे मंगळवारी (दि.25) सत्कार करण्यात आला.
सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील साखर कारखान्याच्या सन 2023 ते 2028 या कालावधीसाठीकरिता पंचवार्षिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दि.21 एप्रिल ही होती. या निवडणुकीमध्ये बावडा गटातून महादेव जालिंदर क्षीरसागर (गिरवी), शेटफळ हवेली गटातून भीमराव गोविंदराव काळे (रेडणी ), अमरदीप विश्वासराव काळकुटे (रेडणी ) यांची बिनविरोध निवड झाल्याने भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सदरचे बिनविरोध निवड झालेले संचालक हे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक असून भाजपचे पदाधिकारी आहेत. या सत्कार प्रसंगी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, बिनविरोध निवड झालेल्या या संचालकांचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी अभिनंदन केले.