स्टार केबी न्यूज

संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील कार्यक्रमात बोलताना राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला जगात एक वेगळे उंचीचे स्थान निर्माण केले असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी  दिलेली लोकशाहीची मूल्ये आजही जगाला प्रेरक आहेत.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जेतवन बुद्ध विहार या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली, लोकशाही दिली. देशाचे ते पहिले कायदेमंत्री झाले.भारतासारख्या बलाढ्य राष्ट्राला जगात एक वेगळे उंचीचे स्थान निर्माण करण्याचे शिल्पकार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत.

आंबेडकरनगरमध्ये नियोजन मंडळाच्या माध्यमातून नव्याने 3 कोटी रुपयांची विकास कामे  मंजूर करण्यात आली आहेत.

यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर तसेच नागरिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.