स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे  इंदापूर ( दि. ६ / ४ / २० २ ३) :
“काशीच्या काळभैरवनाथाचं चांगभलं” च्या जयघोषात गुलालाची मुक्त उधळण करत तोफांच्या व विविध प्रकारचे रंगीबेरंगी शोभेचे दारुकाम व तोफांच्या सलामीत कालठण नं.१ गावचे ग्रामदैवत श्री काळभैरव नाथाची दोन दिवस चाललेली विविध धार्मीक पारंपारीक पद्धीने यात्रा उत्साहात पार पाडली .
 गावचे अतिशय जागृत देवस्थान असलेल्या या श्री काळभैरवनाथ यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे दंडवट, सकाळी आंबीली चा नैवद्य तसेच दुपारी कावडी मिरवणे व मंदीरात भेट सायंकाळी वाजत गाजत विठ्ठल रुक्मीणी मंदीरात दिवसभर रंगरंगोटी केलेली पालखी तसेच देवाचे शिपाई छत्र्या वाजत गाजत काळभैर नाथ मंदीरात आणण्यात आल्या त्यानंतर देवास अभिषेक त्यानंता पोषाख चढविण्यात आला  रात्री ९ वा . पासून ११ वाजेपर्यंत  सह कुटूंब स ह परिवार देवा चे दर्शना बरोबरच शेरणी वाटप करन्यात आल्या त्यानंतर श्री काळ भैरवनाथ व माता जोगेश्वरी च्या मुर्तीं ची लाकडी घोड्यावर बसवून त्याची सजावड करून रात्री बारा नंतर विविध मानक-यांच्या उपस्थितीत व मानकरी अमोल गोसावी यांच्या डमरू वादनानंतर व कांबळे बंधूरात्री बारा नंतर छबीना काढून संपुर्ण गावातून वाजंत्री हालग्या सनई पिपाण्या यांचे वाद्द काम करत  रात्री १२.१५ वाजले पासून पहाटे ५ वाजेपर्यंत मिरण्यात आला
यावेळी दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. छबीना सजावट गोरख पाडुळे’., बाळासाहेब जगताप , हरिदास शेंडगे ,गोपाळ क्षीरसागर , लतीब मुलाणी बाळासाहेब पांडुळे बाळासाहेब मदने  संजय सपकळ ,   नितिन जावळे , पिनू जगताप , . केले
 दर्शन व्यवस्थापन अर्जुन कुंभार काकासाहेब मांढरे यांनी केले
मंदीरावरती आकर्षक विद्युत रोषणाई उत्कृष्ठ साऊंड सिस्टीम रविंद्र कासार यांनी केली
.
 त्यास सतिश घाडगे व सागर जगताप , नंदू जगताप , सुभाष माने यांनी सहकार्य केले .
यात्रेच्या दुसर्‍या दिवशी सकाळी वाजंत्री हजेर्‍या पारपडल्या दुपारी ४ वा. निकाली कुस्त्यांचे मैदान भरविण्यात आले होते
खेळण्याचा कार्यक्रम झाला. यामध्ये लाल मातीतील कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  हस्ते आखाड्याचे पूजन  जेष्ठ वस्ताद साहेबराव पांडुळे , कर्मयोगी चे संचालक हनुमंत जाधव व आण्णासाहेब कोळेकर तानाजी धोत्रे  हरि पाटील यांच्या हस्ते करण्यात  येऊन लाल मातीतील कुस्त्यांना सुरूवात करण्यात आली. या मध्ये  इंदापूर सोलापूर करमाळा अकलुज येथील पैहलवानांनी सहभाग घेतला व लहान मोठ्या १०१ कुस्त्या लावण्यात आल्या.
अने क नामांकित पैहलवानांनी चमकदार कुस्त्या करून कुस्ती शौकिनांची मने जिंकली तसेच बक्षीसी देखील ‘ मिळविली
   शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. . गावचे सुपुत्र डीवायएसपी राहुल मदने ,  सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहीत शिंदे  , सपकळ यांच्या वतीन कै . गुलाबराव पाटील यांच्या स्मरणार्थ शेवटची कुस्ती इनाम रूपये १० हजार रुपये इनामाची लावण्यात कुस्ती लावण्यात आली.
 कुस्त्या व्यवस्थीत पार पाडण्यासाठी महाराष्ट्र चॅम्पियन बाबासाहेब कोळेकर, , संभाजी धोत्रे, बापू शितोळे यांनी मेहनत घेतली
कुस्ती पंच म्हणून महाराष्ट्र चॅम्पीयन संतोष वाघमोडे , वस्ताद बाबासो कोळेकर , संभाजी धोत्रे , सागर मारकड , नवनाथ जावळे,
तात्याराम कोळेकर आदींनी पंच म्हणून काम पाहिले.
कुस्ती समालोचन इंदापूर येथील क्रिडाशिक्षक – श्री . शरद झोळ सर , भास्कर जगताप , आण्णासो धोत्रे इ . केले
यात्रा यशस्वीतेसाठी संचालक हनुमंत जाधव भारत शिंदे संजय माने ,तानाजी सपकळ ,आण्णासाहेब धोत्रे
,संतोष जगताप , संतोष पाडुळे शंकर जावळे आण्णासाहेब कोळे कर दादासाहेब गलांडे तुकाराम पांडुळे तुकाराम पांडुळे इत्यादीने प्रयत्न केले .
यात्रा समालोचन भास्कर जगताप अविनाश शिंदे काकासाहेब मांढरे , डॉ. लक्ष्मण सपकळ यांनी केले
– – – – – – – – – –
चौकट
 कालठण नं १ (ता इंदापूर) येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी देवी माता यांची छबिना मिरवणूक काढण्यात आली होती.
गुलालाची उधळण शोभेचे दारुकाम करत रात्री १२. १५ वा . ते दुसऱ्या
दिवशी पहाटे ५ वागेपर्यंत पवणे सहा तास छबीणा चालला