स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १७ / ३ / २०२३ ) :
कालठण नं . २  ता. इंदापूर  या ठिकाणी गुरुवार दि . १६ मार्च रोजी ऑल इंडिया लिनेस क्लब मल्टिपल चतुर्भुज दिव्य ध्वनी एम एच टू  व लिनेस क्लब कालठण च्या नूतन अध्यक्षा सौ. रतन अंकुश पाडुळे यांच्या पुढाकाराने जागतीक महिला दिनाचे औचित्य साधत कालठण नं २ ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी महिलांचे  मोफत होमीओपॅथी चिकीत्सा व उपचार शिबीरचे आयोजन  पुणे येथील होमीओपॅथी च्या डॉ. उत्कर्षा सरडे  यांच्या नेत्तृत्त्वा खाली करण्यात आले होते .
या शिबीराचे उदघाटन इंदापूरच्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. कल्पणा खाडे यांचे शुभहस्ते करण्यात आले .
यावेळी डिस्ट्रीक लिनेस क्लबच्या अध्यक्षा डॉ . सौ जयश्री गटकुळ क्लबच्या सचिव व इंदापूर अर्बन बँकेच्या संचालिका सौ . उज्वला गायकवाड , खजिनदार कल्पना भोर ,गावच्या सरपंच सौ . सविता जाधव ,माजी सरपंच सौ. संगीता रेडके ,यांच्यासह अनेक महिला यावेळी उपस्थीत होत्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला यावेळी बोलताना डॉ. सौ . कल्पणा खाडे यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांच्या आरोग्याबाबत उद्भवणाऱ्या समस्या व उपचार यावर मार्गदर्शन केले तर डॉ . सौ . उत्कर्ष सरडे यांनी होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये  अस्थमा ,वारंवार होणारी सर्दी , थायरॉईड, मुळव्याध ,पोटाचे विकार , त्वचारोग , वंद्यत्व उच्च रक्तदाब ,  मधुमेह ,कॅन्सर , लठ्ठपणा ,अशा विविध आजारावर होमिओपॅथी उपचार पद्धती किती चांगली आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले तर डॉ . सौ . जयश्री गटकुळ यांनी ग्रामीण भागातील महिला कडून आरोग्य कडे होणारे दुर्लक्ष व आज महिला कशाप्रकारे पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत यावरती मार्गदर्शन केले .
 यावेळी महिला मोठ्या संख्येने महिला व पुरुष  उपस्थित होते न ग्रामपंचायत कार्यालयामध्ये होमिओपॅथी डॉक्टर सरडे यांनी ७५ महिलांची तपासणी करून त्यांच्या विविध आजारावरील औषधे दिले यासाठी इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुश आप्पा पाडुळे, माजी सरपंच लक्ष्‍मण रेडके , संदीप पाडुळे सर , पाडुळे शिवाजी पाडुळे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चव्हाण ,संतोष चव्हाण , अमित जगताप , बाळासाहेब रेडके , ज्ञानदेव पाडुळे हे उपस्थित होते.