स्टार केबी न्यूज
संपादक काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १० / ३ / २० २३) :


नीरा नदीवरील इंदापूर तालुक्यातील तावशी- आसू या दोन गावांना जोडण्या करिता नवीन १७ कोटी रूपयांच्या पूलाला मंजुरी देण्याची मागणी चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली होती. या मागणीची दखल घेत गुरुवारी ०९ मार्च रोजी जाहिर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी तरतूद करण्यात आल्याची माहिती आ. दत्तात्रय भरणे यांनी दिली.

हा नवीन पूल निर्माण झाल्यास शेतकऱ्यांची ऊस वाहतूक, यासह अन्य वाहतूक सुलभ होऊन दळणवळण सोपे होणार असून या निर्माणामुळे तावशी, उदमाईवाडी, थोरातवाडी, कुरवली, उध्दट, घोलपवाडी आदी भागासह फलटण तालुक्यातील अनेक गावांचा कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

आज दिनांक १० मार्च रोजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तीन प्रसिद्ध पत्र दाखवीत राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा दावा खोटा असल्याचे सांगितले.

तावशी, उदमाईवाडी, थोरातवाडी रस्ता प्रतिमा १९४ येथे नीरा नदीवर पूल मंजुरीसाठी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचे नेते असलेले बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेकडे प्रयत्न केले. हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच शिवसेना-भाजप सरकारने तावशी पुलासाठी १७ कोटीचा निधी मंजूर केला असून, या पुलासाठी प्रयत्न केलेली तब्बल तीन पत्रे भाजपने प्रसिद्ध केले.

आमदारांनी खोटे श्रेय घेणे आता तरी बंद करावे, असा सल्ला देत इंदापूर तालुका भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केले आहे. शिवसेना-भाजप सरकारच्या कामाचे श्रेय विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने घेणे हा राज्यातील मोठा विनोद आहे, असा टोला भाजपने लगावला आहे.