प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार :- भाजप नेते हर्षवर्धन पाटील .
इंदापूर शहरात लावलेल्या कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली देशातील गोरगरिबासाठी लाभदायक ठरत असलेली आयुष्यमान भारत म्हणजेच जन आरोग्य योजनेचा इंदापूर तालुक्यातील ९१ हजार २५० लाभार्थ्यांना लाभ मिळणार असून येणाऱ्या महिनाअखेरीस पर्यंत सर्वांना आयुष्यमान भारत (गोल्ड कार्ड) चे वाटप केले जाणार आहे अशी माहिती भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. पाटील हे दि ५ रोजी इंदापूर शहरात शहर भाजपाच्या माध्यमातून ९ ठिकाणी आयोजित केलेल्या कॅम्पला भेटीवेळी नागरिकांशी संवाद साधतात असताना बोलत होते.
पाटील पुढे बोलताना म्हणाले की इंदापूर शहरात ९२५० इतके लाभार्थी आहेत. तर इंदापूर तालुक्यामध्ये ९१२५० इतके लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना येणाऱ्या मार्च महिन्यातील आयुष्यमान भारत (गोल्ड कार्ड) भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काढून दिले जाणार आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना मोठ्या प्रमाणात आरोग्यासाठी मदत होणार आहे.
हर्षवर्धन पाटील ते पुढे बोलताना म्हणाले की आयुष्यमान भारत अथवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. या योजनेद्वारे १०.७४ कोटींहून अधिक गरीब आणि वंचित कुटुंबाना मोफत उपचार करणे हा उद्देश आहे. यामध्ये देशातील जवळपास ५० कोटी नागरिकांचा समावेश होतो. या योजनेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात हजारो कुटुंबांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. या योजनेमध्ये १३२५ पेक्षा अधिक अति दुर्गम आजारांवर उपचार केला जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील ६८ हॉस्पिटल या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत अशी माहिती पाटील यांनी दिली.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद, गटनेते कैलास कदम, युवा नेते स्वप्निल (भैय्या) सावंत,गोरख शिंदे, रघुनाथ राऊत सागर गानबोटे यांच्यासह इंदापूर शहरातील भारतीय जनता पक्षाचे नेते, आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, व कार्यकर्ते उपस्थित होते.
(आयुष्यमान भारत या योजनेचा लाभ कोणत्या लोकांना मिळतो. )
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ २०११ मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जात-निहाय जनगणनेतील ग्रामीण व नागरी भागातील वंचित व व्यवसाय निकषांवर आधारित कुटुंबा ना मिळतो. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजने सह एकत्रितपणे राबवले जाते.प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जात-निहाय जनगणनेत नोंद झालेल्या ८३.६३ लाख कुटुंबातील सदस्यांना संगणकीकृत ई-कार्ड चा वापर करुन योजनेत सूचीबद्ध असलेल्या रुग्णालयात उपचार घेता येतो. महाराष्ट्रात ६९.८३ लाख ई-कार्ड देण्यात आली आहे.
( आयुष्यमान भारत या योजनेचा लाभ किती हजारांपासून लाखांपर्यंत घेता येतो..)
आयुष्यमान भारत योजनेत ३० हजारांपासून तीन लाखांपर्यतचे उपचार घेता येतात. तर पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळतं. आयुष्यमान भारत ही योजना कागदपत्र विरहित योजना आहे. या योजनेला कोणतीही कागदपत्रे लागत नाहीत अतिशय तात्काळ या योजनेतून उपचार केले जातात.
(योजनेतील लाभार्थ्यांना लागणारी महत्त्वाची कागदपत्रे.)
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र, असंघटीत कामगार ओळखपत्र किंवा ही ओळखपत्र उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका व छायाचित्रासह असणारे ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आवश्यक असतो.
इंदापूर क्रिटिकेअर चा या योजनेत समावेश..!!
इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना या योजनेचा लाभ व्हावा व आरोग्याच्या तात्काळ सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून इंदापूर क्रिटिकेअर चा समावेश या योजनेत हॉस्पिटल म्हणून केला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यासह आसपासच्या तालुक्यांतील लोकांना जर आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत उपचार घ्यायचे असतील तर त्याची व्यवस्था आता पुणे, मुंबई ला नजाता इंदापूर मध्येच उपलब्ध झाली आहे.
भाजप सरकारची महत्वकांक्षी योजना…!!
केंद्रामध्ये मोदी सरकार असत्यताच केंद्र सरकारने तात्काळ आयुष्यमान भारत म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची घोषणा व सुरुवात केली. या योजनेचा देशातील कोट्यावधी गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील लोकांनी लाभ घेतला. त्यामुळे सदरची योजनाही भाजप सरकारने सुरू केल्याने त्यांची महत्त्वकांक्षी योजना म्हणून नावलौकिक आहे. त्यामुळेच इंदापूर तालुक्यातील ९१ हजार २५० लोकांना या योजनेचा लाभ होणार आहे.

