स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ३ / ३ / २० २३) :

कांदलगावचे विद्दमान सरपंच मालोजीआप्पा ( रविंद्र ) दादासाहेब पाटील वय ६२ वर्षे इंदापूर पंचायत समीती च्या माजी सभापती व माजी पुणे जिन्हा परिषद सदस्या सौ . ऋतुजाताई पाटील यांचे ते पती होत त्यांचे काल गुरुवार दि . २ मार्च रोजी सायंकाळी पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटल येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांचा मृतदेह आज शुक्रवार दि . ३ मार्च रोजी पहाटे ५.३० वा . त्यांचे गावी कांदलगांव ता. इंदापूर येथे आणून त्यांच्या घरी जनतेला दर्शनाकरीता ठेवण्यात आला यावेळी ग्रामस्थ तालुक्यातून त्याचप्रमाणे अनेक जिल्ह्यातून नागरीक नातवाईक तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते सामाजिक संस्थांचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी महिला पुरुष अशा हजारोंनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा तीन किलोमिटर त्यांच्या शेतात नेण्यात आली त्यानंतर
सकाळी ९.३० वा . त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कन्या वैष्णवी पुतणे यश व अर्थव यांनी मुखाग्नी देऊन करण्यात आला .
इंदापूर तालुक्यात सामाजीक व राजकीय क्षेत्रात योगदान व सदन शेतकरी असलेले पाटील कुटूंब परिचीत आहे .
या अंतविधी वेळी
माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील ,तसेच साठे सर , पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, सोनाई उद्योग समुहाचे सर्वेसर्वा दशरथ दादा माने , राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणेजिल्हा सरचिटणीस प्रदीप दादा गारटकर ,राजकुमार पाटील इ . भावपूर्ण श्रध्दांजली वाहीली यावेळी अनेक अनेक साखर कारखान्याचे आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक अनेक गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजीक व राजकीय संस्थांचे संघटनांचे पदाधिकारी अधिकारी हे बहुसंखेने उपस्थीत होते .
