इंदापूर :
केंद्रिय मंत्री अमित शहा व उपमख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी हर्षवर्धन पाटील यांना केंद्रस्तरावर मोठी जबाबदारी दिली आहे.त्या पदाचा इंदापूर तालुक्याला फार मोठा फायदा होणार आहे.ही बाब तालुक्यातील विरोधकांच्या मुळीच पचनी पडणारी नाही.त्यामुळे विरोधक आता अफवा पसरवत आहेत की हर्षवर्धन पाटील यांना राज्य सभेवर डावलले.त्यांना उमेदवारी दीली नाही.विरोधकांच्या अफवाचे खंडण करताना राजवर्धन पाटील म्हणाले की राज्यसभेच्या जागेसाठी हर्षवर्धन पाटील यांनी पक्षाकडे कसलीही मागणी केली नव्हती.त्यामुळे लोकांनी विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.आगामी विधानसभेला हर्षवर्धन पाटील वरचड ठरणार असल्याची चिंता विरोधकांना सारखी सतावत आहे.त्यांना आत्ता रात्रीची झोपही व्यवस्थित लागत नाही.त्यामुळे विरोधक व्यक्तिद्वेषातुन अफवा पसरवु पहात असुन अशा अफवावर कोणीही विश्वास ठेवु नये.हर्षवर्धन पाटील हे २०२४ ची विधानसभा कसल्याही परिस्थितीत लढवाणार असल्याची घोषणा कर्मयोगी सहकारी साखर कारखाण्याचे तज्ञ संचालक राजवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन जाहीर करत आगामी विधानसभा तयारीचे रणशिंग फुंकले.
तालुक्यातील भाजपा सरपंच व उपसरपंच,पदाधीकारी फोडाफोडीचे राजकारण विरोधकाकडून होत आहे का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर उतर देताना राजर्धन पाटील म्हणाले की,काही दिवसापूर्वी तालुक्यातील कुंभारगावच्या सरपंचावर दबावतंत्राचा वापर करून सरपंच बदलण्याचा प्रयत्न झाला.हा प्रकार सर्व जनतेने पाहीला.
यातुन एकच संकेत मिळतो आहे की कोणीतरी घाबरलेला आहे.आमच्यावर आरोप करणार्यांनी आता स्वतचे परिक्षण करण्याची वेळ आता आलेली आहे.दत्तात्रय भरणे यांचे प्रत्यक्ष नाव न घेता राजवर्धन पाटील म्हणाले की काही लोक हे विसरले आहेत की त्यांच्या अगोदर आम्ही या पक्षात आहोत, परंतु ते आता आलेत.२००९-२०१४-१९ ला जे घडले ते आता २०२४ ला होऊ नये याबाबतची खबरदारी म्हणुनच आजपासुनच भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातुन बैठका व तयारची सुरूवात करत असल्याचे राजवर्धन पाटील म्हणाले.
यावेळी अंकीता पाटील-ठाकरे म्हणाल्या की,युवा मोर्चाच्या माध्यमातुन बैठका घेवुन सर्व युवा वर्गाला एकत्रीत करून त्यांचे ज्वलंत प्रश्न ,बेरोजगारी,प्रश्न सोडविण्यासाठी तालका पिंजुन काढत आहोत.तालुक्यातील संस्थांचे जाळे व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असल्याने आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.आधुनिक व विकसीत इंदापूर तालुका बनविण्याची आमची संकल्पना असल्याचे सांगीतले. दहा वर्षे सत्ता चुकीच्या माणसाच्या हातात दिल्याने मागील दहा वर्षात आपण विस वर्षे मागे गेलो आहोत.तालुक्यात कसलाही विकास झालेला नाही.आमच्यावर नूसते
सोडविण्यासाठी तालका पिंजुन काढत आहोत.तालुक्यातील संस्थांचे जाळे व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असल्याने आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.आधुनिक व विकसीत इंदापूर तालुका बनविण्याची आमची संकल्पना असल्याचे सांगीतले. दहा वर्षे सत्ता चुकीच्या माणसाच्या हातात दिल्याने मागील दहा वर्षात आपण विस वर्षे मागे गेलो आहोत.तालुक्यात कसलाही विकास झालेला नाही.आमच्यावर नूसतेच बिनबुडाचे आरोप करायचे या व्यतिरिक्त विरोधकांना काहीच जमलेल नाही.त्यामुळे आता सत्ता बदलाचे वारे झपाट्याने वाहु लागले असुन कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन अंकिता पाटील-ठाकरे यांनी उपस्थित युवा कार्यकर्त्यांना केले
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत,जि.प.
निवडणुकीची जोरात तयारी सुरू असुन जास्तित जास्त जागी भाजपाला विजयी करण्याचा निर्धार आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या ताईंना मदत करणार का ? असा प्रश्न अंकिता पाटील-ठाकरे यांना विचारला असता त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की आम्ही सध्या महा आघाडीत आहोत.मागील तीन निवडणुकीच्या वेळेस ताईंना आम्ही भरपूर सहकार्य केले परंतु तिनही वेळेस ताईंनी निवडणुकीत दिलेला शब्द पाळलेला नाही.उलट त्यांनी तीनही वेळेस आमच्या पाठीत खंजिर खुपसत फसवणुक करण्याचे काम केले आहे.यावेळेस जो उमेदवार जाहीर होईल तो विधानसभेला आमचे काम करणार असेल तरच आम्ही त्यांचे काम करण्याचा विचार करणार आहोत.सध्या विधानसभेची जोरात तयारी सुरू केली असुन लोकांनी विरोधकांच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन अंकिता-पाटील ठाकरे यांनी केले.
