Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1
खडकवासला 100 टक्के भरल्याने पाझर तलावांमध्ये पाणी सोडणे हा जलसंपदाचा कामकाजाचा भाग - अँड. जमादार - - संपादक:- काकासाहेब मांढरे

खडकवासला 100 टक्के भरल्याने पाझर तलावांमध्ये पाणी सोडणे हा जलसंपदाचा कामकाजाचा भाग – अँड. जमादार
– आमदारांनी फुकटची श्रेय घेऊ नये
इंदापूर : प्रतिनिधी दि.2/10/23
खडकवासला धरण हे 100 टक्के क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे खडकवासला कालव्यावरील पाझर तलावांमध्ये पाणी सोडणे हा जलसंपदा विभागाच्या कामकाजाचा भाग आहे. त्यामुळे आम्ही सूचना केल्यामुळे तलाव भरून घेण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे, असे जाहीर करून नाहक श्रेय घेण्याचा प्रयत्न इंदापूरच्या लोकप्रतिनिधींनी करू नये, असे प्रतिपादन इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी सोमवारी केले.
खडकवासला कालव्याद्वारे इंदापूर तालुक्यातील पाझर तलावांमध्ये पाणी सोडले जाणार आहे. याबाबतच्या सूचना खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत. या सूचनेनुसार आज रात्रीपासून तालुक्यातील तलावांमध्ये पाणी सोडले जाणार आहे, अशा आशयाच्या बातम्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत. त्या संदर्भात भाजपचे तालुकाध्यक्ष अँड. शरद जमदार यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
ते पुढे म्हणाले, सध्या खडकवासला साखळी धरणे 100 टक्के क्षमतेने भरली आहेत.पुणे जिल्ह्यात सर्वत्र पाऊस असल्याने उभ्या पिकांसाठी पाण्याची मागणी नसल्याने, अशा परिस्थितीत जलसंपदा विभागाकडून कालव्या मधून पाणी सोडून पाझर तलाव भरून घेण्याचे काम प्रत्येक वर्षी केले जाते. इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे खडकवासला कालवा सल्लागार समितीच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते, असे असताना खडकवासला कालव्यामधून तलाव भरून घेण्याच्या जलसंपदा विभागाच्या निर्णयाचे श्रेय इंदापूरच्या लोकप्रतिनिधींनी घेऊ नये, असा टोलाही अध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी लगावला. भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्यासंदर्भात सतत जागृत आहेत. खडकवासला कालव्याद्वारे इंदापूर तालुक्यातील मदनवाडी ते तरंगवाडी पर्यंतच्या 14 पाझर तलावांमध्ये पाणी सोडून, सर्व पाझर तलाव भरून घेण्याची मागणी हर्षवर्धन पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे महिनाभरापासून सातत्याने लावून धरली होती, अशी माहितीही यावेळी अँड जामदार यांनी दिली.
•चौकट:-
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार :अँड जामदार
_________________________
खडकवसाला कालव्यावरील इंदापूर तालुक्यातील पाझर तलाव भरून घेण्याचा निर्णय घेतले बद्दल पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे तसेच महायुती सरकारचे भाजपचे तालुकाध्यक्ष अँड शरद जामदार यांनी यावेळी आभार व्यक्त केले.
——————————-