स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर प्रतिनिधी ( दि.15/8/23 ):

शहाजीनगर येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरती 77 वा स्वातंत्र्य दिन मंगळवारी (दि.15) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
देशाच्या स्वातंत्र्याला आज 76 वर्षे पूर्ण झाली आहेत. या स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये देशाने कृषी-सहकार, औद्योगिक, धवल क्रांती केल्यामुळे ग्रामीण भागाचा कायापालट झाला आहे. राज्याचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नीरा भीमा कारखान्याची स्थापना केल्यामुळे या परिसराचे नंदनवन झाले आहे. आगामी गळीत हंगामासाठी कारखाना सज्ज झाला असून, कारखान्याचा अडचणी काळ संपला आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी भाषणात स्पष्ट केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासराव वाघमोडे, कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी केले. यावेळी जेष्ठ संचालक दत्तात्रय शिर्के, प्रतापराव पाटील, संजय बोडके, बबन देवकर, भागवत गोरे, दत्तात्रय पोळ, माणिकराव खाडे, माजी प्राचार्य के. एस. खाडे, अधिकारी-कर्मचारी वर्ग उपस्थित होता. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी केले.
_____________________________
फोटो:-शहाजीनगर येथे निरा भीमा कारखान्यावरती अध्यक्ष लालासाहेब पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.