Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/starkbnews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1
शिवाजी एज्युकेशन संस्थेचा गुणवत्तेचा ब्रँड निर्माण करावा - हर्षवर्धन पाटील - संपादक:- काकासाहेब मांढरे

स्टार केबी न्यूज

संपादक : काकासाहेब माढरे इंदापूर  ( दि.6/8/23 ) :


बावडा येथील श्री शिवाजी एज्युकेशन संस्थेच्या विविध शाखांमध्ये सुमारे सात हजार विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात शिवाजी शिक्षण संस्थेचा गुणवत्तेचा ब्रँड निर्माण करावा, त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.5) सुरवड येथे केले.
श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा च्या वतीने संस्थेमध्ये सेवानिवृत्त झालेल्या नऊ शिक्षक व कर्मचाऱ्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील मार्गदर्शन केले.
या शिक्षण संस्थेचा विस्तार वाढला आहे. संस्थेच्या वाढीसाठी कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी परिश्रम घेतले. कर्मचाऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आपण आत्मसात कले पाहिजे. आपल्या शिक्षण संस्थेतून अष्टपैलू विद्यार्थी निर्माण व्हावेत, विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुदृढतेकडेही लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
आम्हाला मिळत असलेला राजयोग हा केवळ मानसन्मानासाठी नसतो तर समाजाच्या विकासासाठी त्याचा उपयोग करावयाचा असतो. या तत्त्वाचे पालन केल्याने आज तालुक्यातील हजारो कुटुंबांना रोजीरोटी उपलब्ध झाली आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी व्ही.बी.मेटकरी, डी. जी. गायकवाड, व्ही.यु. बारबोले, ए. पी. देशपांडे, श्रीमती एम.एस.भोसले, ए. डी. होनमाने, बी. एस. चव्हाण यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी केले. यावेळी संस्थेचे संचालक उदयसिंह पाटील, शिवाजी पाटील, श्रीमती एम. एस. भोसले, डी. जे. गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सचिव किरण पाटील, सुरेश मेहेर, उमेश सुर्यवंशी, प्रसाद पाटील, दादासाहेब घोगरे, बाळासाहेब कोकाटे, सुधीर पाटील, स्वप्निल घोगरे, हरिभाऊ बागल, संजय घोगरे, शिवाजी कोरटकर, नामदेव घोगरे, शंकर घोगरे, रणजीत वाघमोडे, मोहन कोरटकर, धनाजी घोगरे, बाळासाहेब घोगरे, प्राचार्य डी. आर. घोगरे, जी. एस. घोरपडे, सी. टी.कोकाटे, भीमराव आवारे, ए. बी. सुळे, एस. डी.घोगरे, डॉ. एल. एस. वावरे, गुरव, व्ही. के. मोहिते आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमर निलाखे व एस. टी. मुलाणी यांनी तर आभार संतोष सुर्यवंशी यांनी मानले.
_________________________
.