मार्फत कर सहायक(Tax Assistant) पदी निवड. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार श्री रमेशदादा पाटील यांनी अमित याचा आज इंदापूर येथे कर सहायक म्हणून निवड झाल्या बद्दल सत्कार केला व पुढील सेवा करण्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत, सरडेवाडी तालुका इंदापूर येथील अमित किसान शिताफ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या कर सहायक पदासाठीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या मध्ये अमित यांची कर सहायक म्हणून निवड झाली आहे, अमित याने अतिशय कष्टातून हे यश मिळवले आहे गावातील नागरिकांनी अमितला शुभेच्छा दिल्या आहेत या यशामध्ये अमितच्या आई वडील छोटा भाऊ यांचा सिहाचा वाट आहे अमित म्हणाला की माझे आई वडील यांचे आशीर्वाद व छोटा भाऊ याचे प्रेम व कष्ट आणि माझे गुरु तसेच मित्र मंडळी या सर्वांचा या यशामध्ये सहकार्य लाभले आहे