Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/starkbnews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1
उजनी धरणग्रस्त आक्रमक! गुढीपाडव्याला 'बोंबाबोंब' करत शासन निर्णयाची केली होळी; इंदापुरात आंदोलनाचा भडका - संपादक:- काकासाहेब मांढरे

स्टार केबी न्यूज

संपादक – काकासाहेब मांढरे

इंदापूर (प्रतिनिधी) दि . २०: संपूर्ण महाराष्ट्र गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचा उत्साह साजरा करत असताना, उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने करायात आलेल्या आंदोलनात शेतकरी आणि मच्छीमारांनी मात्र आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी संताप व्यक्त केला आहे. इंदापूर तालुक्यातील कालठण नं. १ येथे जलसंपदा विभागाच्या ‘अतिक्रमण हटाव’ नोटिसांची होळी करत, शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर जोरदार ‘बोंबाबोंब’ आंदोलन केले.

नेमका वाद काय?

​महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने १७ जून २०१९ आणि ८ ऑक्टोबर २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार (GR), उजनी पाणलोट क्षेत्रातील जमिनींवरील अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, शेतकरी नेत्यांचा आरोप आहे की, या सुपीक जमिनी ४९ वर्षांच्या कराराने खाजगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. यामुळे पिढ्यानपिढ्या या जमिनीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

आंदोलकांचे प्रमुख मुद्दे आणि मागण्या:

    • मंत्र्यांच्या आश्वासनाकडे पाठ: मुंबईत झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निर्णयाला स्थगिती देण्याचे आणि गाळपेर जमिनी धरणग्रस्तांनाच भाडेतत्त्वावर देण्याचे मान्य केले होते. मात्र, अद्याप याची ठोस अंमलबजावणी झालेली नाही.
    • हक्काच्या जमिनीचा प्रश्न: इंदापूर, दौंड, कर्जत, करमाळा आणि माढा तालुक्यातील सुमारे १३ हजार हेक्टर गाळपेर जमीन मूळ प्रकल्पग्रस्तांनाच कराराने परत मिळावी, अशी प्रमुख मागणी आहे.
    • प्रकल्पांना तीव्र विरोध: धरणावरील ‘फ्लोटिंग सोलर प्रोजेक्ट’ आणि प्रस्तावित पर्यटन केंद्रांमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या आणि मच्छीमारांच्या उपजीविकेवर गदा येणार आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता हे प्रकल्प लादले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

​”अधिवेशन संपले तरी मुंबईतील बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झालेली नाही. सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी आज आम्ही सणासुदीच्या दिवशी हे आंदोलन करत आहोत. जोपर्यंत हा जुलमी निर्णय कायमस्वरूपी रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.”

आंदोलक शेतकरी

 

आंदोलनाचा वणवा पेटला

​हे आंदोलन केवळ कालठणपुरते मर्यादित राहिलेले नाही. उजनी पाणलोट क्षेत्रातील कळाशी, उजनी आणि माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये या अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारण्यात आला आहे. शासनाच्या जाचक अटींच्या शासन निर्णयाची होळी करत शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

उपस्थित मान्यवर

​कालठण नं. १ येथील आंदोलनात कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव, इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक सचिन जाधव, माजी सरपंच लालासाहेब जगताप, पोपट पाडुळे ,सतिश शिंदे, शंकर जावळे , संजय माने , ब्रम्हदेव सपकळ , दादासाहेब जगताप , अशोक भगत  कालठण विकास सोसायटीचे संचालक दशरथ मदने, शिवाजी पाडुळे, इंद्रजित गिड्डे , नितीन जावळे , अनिल जगताप , अजिनाथ नरुटे , विलास जगताप ,यांच्यासह कालठण आणि पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश शिंदे यांनी केले, तर आभार महाराष्ट्र चॅम्पियन बाबासाहेब कोळेकर यांनी मानले. आता या वाढत्या जनक्षोभानंतर प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे