. स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे ( दि .१५ / १२ / २०२४ ) :
नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधी मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पार पडला यामध्ये भाजपा , राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाच्या ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली त्यामध्ये इंदापूर विधानसभा मतदार संघातून सलग तिन वेळा निवडूण आलेले विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे यांना कॅबिनेट मंत्रीपदी शपथ दिल्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये एकच जल्लोष होऊन फटाक्यांची आतषबाजी करत गावोगावी त्याचप्रमाणे इंदापूरातील बाबा चौक येथे एलएडी स्क्रीन लावली होती त्या वरती तेथे मोठ्या प्रमाणात जमलेल्या भरणे यांच्या चहात्यांनी भरणे मामांचा शपथ ग्रहण सोहळा लाईव्ह पाहिला व एकमेकांना पेढे भरूवून तसेच गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला व भरणेमामा जिंदाबाद अजितदादा जिंदाबाद च्या घोषणा दिल्या.