स्टार केबी न्यूज
संपादक काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि . १६ / १२ / २०१४ ) :

= = = = = = = = =
*तीन दिवस विविध* *कार्यक्रम ;* *लाखो हिंदु* *मुस्लीम* *भाविकांची हजेरी .*
— – – – – – – –
इंदापूरचे ग्रामदैवत हिंदु मुस्लीम धर्मीयांचे श्रध्दास्थान हजरत चांदशाहवली बाबांचा उरूस मोठ्या उत्साहात पार पडला यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तीन दिवसीय उरुसाच्या काळात लाखो भाविकांनी बाबांच्या मजारीचे दर्शन घेतले .
उरुसाचे यंदाचे ४६० वे वर्ष होते . सोमवारी दि . ९ डिसेंबर परंपरेनुसार हमीद आत्तार यांच्या घराण्याकडे संदलचा मान आहे . संदलच्या दिवसा पासून उरुसाला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा विरश्री मालोजी राजे भोसले हे बाबांच्या मजाखर चादर चढवत . पुढे ही परंपरा ब्रिटीश राजवटीत इंग्रज अधिकारी मजावर फुल्यांची चादर चढवत असत स्वातंत्र्या नंतर ही परंपरा पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचाऱ्यांना प्रथम गल्लफ व चादरचा मान देण्यात येतो .यावर्षी इंदापूरचे पी . आय . मोहिते साहेब व कर्मचाऱ्यांनी रीतीरिवाजा प्रमाणे पोलीस ठाण्या पासून पारंपारीक वाद्यांच्या गजरात गल्लफ व फूलांची चादर मजारवर चढवली .
मंगळवार दि १o डिसेंबर उससाच्या मुख्य दिवशी मजारचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी झाली होती .
यावेळी उरूस कमीटी कडून गोडजर्दा व शिरा महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात आले
उरुसाच्या शेवटच्या दिवशी बुधवार दि . ११ डिसें . सकाळी जियारतचा विधि करण्यात आला . रात्री ८ वाजता मानाच्या झेंड्याची मिरवणू ग्राम प्रदिक्षणेला निघताच भाविकांनी बाबांच्या झेंड्याला नारळाचे तोरण बांधून व झेंड्यावर रेवड्यांची उधळण करत दर्शनासाठी गर्दी केली होती .
उरूस कमीटीचे अध्यक्षआझाद पठाण , प्रमुख मानकरी हमीदभाई आत्तार , उपाध्यक्ष .महादेव चव्हाण मुनीर मुजावर. महामुद मुजावर , जाफर मुजावर. मुनीर बेपारी ,बन्सी भंडलकर तशु सय्यद . अल्तमश शेख. दादा इनामदार अल्ताफ पठाण. मुख्तार पठाण, शकूर शेख. सोहेल पठाण. सकलेन पठाण दिपक मगर विजय सिताफ अनिस पठाण , माने कॉन्स्टेबल व कमीटीचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले .
उरुसासाठी इंदापूर पोलीस स्टेशन व इंदापूर नगर परिषद यांचे मोलाचे सहकार्य मिळाले .
चौकट :
*विविध मान्यवरांनी* *घेतले दर्शन*
उरुसा निमित्त दर्ग्यावर दस्तगीर लाईट डेकोरेशन यांनी लक्षवेधक आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती .
आमदार दत्ता मामा भरणे , तहसिलदार साहेब .
कृषी उत्पन्न समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ते ॲड .राहूल मखरे
राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर . कर्मयोगी शंकरराव पाटील सह . कारखान्याचे उपाध्यक्ष
भरत शेठ शहा .
मुख्याधिकारी रमेश ढगे
अरविंद वाघ , कृष्णा ताटे , नगर सेवक कैलास कदम. अमर गाडे. पोपट शिंदे गजानन गवळी अर्बन बँकेचे मच्छींद्र शेटे, दादा पिसे व अविनाश कोतमिरे इ . .