–
कामधेनू सेवा परिवाराकडून १६ वर्षापासून
विधवां भगीणींचा राज्यातील सामाजिक आगळ्या वेगळ्या अशा उपक्रमाचे आयोजन .
– – – – – – – – – – – – – – – – – – – –
स्टार केबी न्यूज
संपादक काकासाहेब मांढरे
इंदापूर ( दि.31/10/24 ) :
समाजातील अनिष्ट रूढी परंपरा यांचा त्रास आजही महिला भगिनींना होत आहे. समाजातील सुमारे 3 हजार हजार विधवा भगिनींचा, वीरपत्नी, वीरमाता, आजी-माजी सैनिकांच्या पत्नी यांचा कामधेनू सेवा परिवाराने केलेला सन्मान अतिशय कौतुकास्पद आहे, असे असे गौरवोद्गार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
शेटफळ पाटी (ता. इंदापूर) येथे कामधेनू सेवा परिवाराच्या वतीने विधवा भगिनीसाठी दीपावलीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि.29) भाऊबीज कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्याचे 16 वे वर्ष होते. या कार्यक्रमांस पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर जिल्ह्यातील हजारो विधवा भगिनी उपस्थित होत्या. यावेळी सर्व भगिनींना साडी-चोळी व त्यांच्या मुलांना कपडे व मिष्ठान्न भोजन देण्यात आले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, कामधेनू सेवा परिवार मार्फत विधवा भगिनींच्या शेकडो मुला-मुलींना शालेय शिक्षणासाठी दत्त घेतली जात आहेत. हे कार्य अद्वितीय व समाजाला प्रेरणादायी असे आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन वीर पत्नी वीरपत्नी पुष्पलता शेटे ( रा. गोतंडी ) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक कामधेनू सेवा परिवाराचे संस्थापक समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे यांनी केले. विधवा भगिनींच्या शेकडो मुला-मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेतले जात आहे. विधवा भगिनींनी जोडवे, मंगळसूत्र, कुंकू हे सौभाग्य अलंकार वापरावेत व त्यांच्या नावापुढे सौभाग्यवती शब्द लावण्याचे काम कामधेनू सेवा परिवार करीत असल्याचे डॉ.लक्ष्मण आसबे यांनी भाषणात सांगितले. त्यानंतर हजारो भगिनींच्या उपस्थितीत बंधूंना ओवाळण्याचा सोहळा एकाच वेळी संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह. भ. प. कान्होबा महाराज देहूकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराव मोहिते, अंकिता पाटील ठाकरे यांची भाषणे झाली.
यावेळी अशोकराव घोगरे, भाग्यश्री पाटील, रावसाहेब मगर, अनिता खरात, रज्जाक पठाण, हनुमंत जगताप, लक्ष्मण राजगुरू, नवनाथ पवार, तात्यासाहेब कोरटकर, सचिन काटकर, दाऊत मुलाणी, पतंजली समितीचे सदस्य, माजी सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन फलफले सर तर आभार धैर्यशील देशमुख यांनी मानले.
_____________________________