स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर (दि . २५ / ४ / २०२४ ) :
इंदापूर तालुक्यात जसजशी लोकसभेच्या निवडणुकीची रंगत येत जाते तसतसा गावागावात राजकारणाचे आखाडे रंगू लागलेले आहेत. काहींना पदे मिळू लागलेत तर काहींना पदावरून डच्चू देण्यात येत आहे. असाच गंगावळण चा हिरो समजणारा स्वयंघोषित पाटील ना घर का ना घाट का झाला आहे.
याबाबत हाती मिळालेल्या कागदपत्रावरून असं समजून येते की नुकताच काही महिन्यापूर्वी गंगावळ्यांच्या प्रशांत गलांडे यांनी त्याची पत्नी सरपंच आणि काही कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून अजित पवार गटाकडून लोकसभेचे एक पद घेतलं होते. प्रशांत गलांडे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करता येत म्हटल्यानंतर आमदार दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा उंच डोंगरावरून घोषणा करावी तशी विकास कामाची घोषणा केली. आणि तीन कोटीचा निधी गंगावळण साठी दिल्याचे जाहीर केले.
या तीन कोटीचा आनंद अजून घेतोय की नाही तोपर्यंत पाठीमागे दोन महिन्यापूर्वी दिलेलं पद काढून पुरंदरचे संग्राम सस्ते यांना दिले. त्यामुळे प्रशांत गलांडे यांना पक्षाने थेट कात्रज चा घाट दाखवला. मात्र सध्या प्रशांत गलांडे यांनी राजीनामा दिल्याचे पत्र जिल्हाध्यक्षांना दिले आहे. पुरंदरचे संग्राम सस्ते यांची प्रशांत गलांडे यांच्या जागी नियुक्ती झाल्यानंतर तब्बल आठ दिवसानंतर प्रशांत गलांडे यांनी जिल्हाध्यक्षांना पत्र लिहून राजीनामा दिला आहे.
त्यामुळे गंगावळण मधील शरद पवार गटाचे व इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांच्या विरोधात माणसं उभा करण्यासाठी केलेली नियुक्ती आणि दिलेला निधी मात्र हा आनंत काळापर्यंत टिकेल असं राहिलं झालं नाही.इंदापूर मधील राष्ट्रवादीचा “प्रशांत गलांडे ‘ ना घर का-ना घाट का.