Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1
पतंजली योग परिवार कालठणच्या ५२ योग साधक , साधीकांनी  ' घेतला कास पठार अजिंक्यतारा किल्ला व वज्राई धबधब्याच्या सहलीचा आनंद .  - संपादक:- काकासाहेब मांढरे

 

स्टार केबी न्यूज

काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि १४ / ९ / २० २३):

कालठण नं.१ ता इंदापूर जि पुणे येथे गेली ११ महिने झाले इंदापूर पतंजली योग समीतिचे योग मार्गदर्शक श्री दत्तात्रय अनपट व मदनजी चव्हाण साहेब व त्यांच्या सर्व योग शिक्षक शिक्षीका यांच्या मार्गदर्शना खाली कर्मयोगी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन भागवत भाऊ गटकुळ , पत्रकार व श्री काळभैरवनाथ टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सचे मालक श्री काकासाहेब मांढरे , बिल्डींग कॉन्ट्रॅक्टर दाऊत भाई मुलाणी, प्रसिद्ध निवेदक राजाभाऊ जगताप , निरंकारी मंडळाचे विकास सावंत , दैनिक पुढारीचे पत्रकार भारत शेंडगे सर , कालठण चे माजी उपसरपंच सचिन जाधव यांनी आयोजीत केलेल्या निसर्गाच्या सानिध्यातील सहलीस

माजी सरपंच संपत जगताप , सिने अभिनेते भिमसेन चव्हाण , वैभवी पोल्ट्री फिडस सप्लायर चे मालक श्री .अविनाश जगताप ,विष्णु जावळे ,संतोष पांडुळे , दत्तात्रय मदने,तसेच महिला पतंजलीच्या सौ अमिता पाडुळे, सौ आशा पाडुळे , सौ . पल्लवी जाधव , सौ . सुंदर शेंडगे , राबीया मुलाणी , सौ . कासाबाई गटकुळ सौ . गयाबाई गटकुळ , सौ . कल्पना जगताप , श्रीमती कोंदण पठाण

यांच्या सहकार्याने रविवार दि . १० सप्टेंबर २०२३ रोजी खाजगी लक्झरी बस द्वारे २२ महिला योग साधिका व २३ पुरुष योग साधक ७ मुले मुली अशी ५ २ जणांनी पहाटे ४ वा. प्रवास सुरु केला वाटेत अल्पोहार चहा घेतल्या नंतर सकाळी ९ वाजता सातारा येथील ऐतीहासीक अजिंक्य तारा किल्ला ३ किलो मीटर जंगलवाटेने पायीचढाई करून त्याठिकाणी ऐतीहासीक भव्य प्रवेशद्वार दरवाजे ,तळी , टाकसाळे , सदर , अशा अनेक आठवणी व नैसर्गाचा आनंद घेतल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यातील लांबूनच नजरेस पडणारा बाराही महिने वाहनारा अतिशय उंचीवरून खालती पाढरे शुभ्र फेसाळलेले पाणी टप्याने पडणारे व धुक्यात क्षणमर दर्शन देत लुप्त होणारे वज्राई धबधब्याचे अविस्मरणीय दृष्य तसेच पावसाचा तसेच जवळून जाणारे ढग  ,धुके व अंगाला स्पर्श करून जाणारे गार वारे यांचा  हवामान व वेळे अभावी धबधब्यागवळ जाता नाही आले परंतु लांबून त्याचे दर्शन छान मिळाले व मन आनंदीत झाले .

त्यानंतर पार्किंग मध्ये आपली बस पार्किंग केल्यानंतर तेथील लोकल बसने कास पठाराकडे गेल्या नंतर तेथे उमललेली व उमलण्याच्या मार्गावर असलेल्या विविध जातीच्या व रंगाच्या लहान मोठ्या फुलांचे विस्तीर पसरलेले समुह पहाताना पृथ्वीवरती स्वर्ग अवतरल्या सारखे वाटत होते यावेळी ढगाळ हवामान व अंगाला स्पर्श करून जाणारे ढग त्याचप्रमाणे अधुन मधून येणाऱ्या पावसाच्या सरींमुळे भिजण्याचा आनंद वेगळाच अनुभव घेतल्या नंतर परतताना वाटेत सुंदर हिरवळीवर ती बसून वनभोजनाचा आनंद घेऊन त्या ठिकाणी उखाने ,गाणी ,भजन , भारूड , कविता , विनोद ,  अशा प्रकारचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला त्यामध्ये सर्वांनी सहभाग घेऊन आनंद घेतला .

त्यानंतर प्रवास करत रात्री हॉटेल मध्ये भोजन करून रात्री १२. ३० वाजता सहल कालठण येथे येऊन समाप्त झाली .

पतंजली योग परिवार कालठण च्या या निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आनंद घेत व छत्रपती शिवाजी राजांनी काही काळ वास्तव्य केलेला अजिंक्य तारा किल्ल्याची चढाई करून तेथील किल्ल्याचे विलोभनीय नैसर्गीक दृष्य पाहिल्या नंतर सर्व योग साधक , साधिका यांच्या   मध्ये आनंद व उत्साह ओसंडून वाहताना जाणवत होता .