स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर – दि. २१ / ८ / २०२४ ) :
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने इंदापूर तालुका विकास आघाडीच्या २१ शाखांची एका दिवसांमध्ये उत्साहात बुधवारी (दि. २१)आँगस्ट रोजी
उद्घाटने करण्यात आली. सन 2024 हर्षवर्धन पाटील फिक्स आमदार होणारच आमचं ठरलय..विकास आघाडी अशा जोरदार घोषणा बाजी या शाखांच्या उद्घाटन प्रसंगी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली.
बुधवारी उद्घाटन करण्यात आलेल्या 21 शाखा पुढील प्रमाणे:-1) म्हसोबाचीवाडी 2) भादलवाडी 3) पिलेवाडी 4) कळस 5) रेडा, 6) शहाजीनगर 7 ) भोडणी 8) खोरोची 9) ओझरे10) हिंगणगाव 11) बाभुळगाव 12) अंथुर्णे-(उखळमळा) 13) अंथुर्णे- (सावतामाळीनगर) 14)रणगाव 15) लाखेवाडी 16) काटी 17) आडोबा वस्ती-नरसिंहपुर 18 )चाकाटी 18) टणु 20) अगोती नं.2, 21) कालठाण नं.2.इंदापूर विधानसभा मतदार संघाचे सन 2024 चे आमदार हर्षवर्धन(भाऊ) पाटील हेच असणार आहेत.
त्यासाठी आम्ही जीवाचे रान करू असा ठाम निर्धार विकास आघाडीच्या शाखांच्या उद्घाटन प्रसंगी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या दरम्यान, इंदापूर तालुक्यामध्ये आजपर्यंत 71 विकास आघाडीच्या शाखांची स्थापना झाली असून, लवकरच शाखा स्थापनेचे एक शतक (100 शाखा) पूर्ण करू, असा विश्वास विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला