स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १९ / ४ / २० २३) :
१८/०४/२०२३ रोजी शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्ट च्या अध्यक्ष मा. पद्माताई भोसले यांच्या वाढदिवसानिम्मित संस्थेचे विश्वस्त, सल्लागार, कर्मचारी व विद्यार्थी यांनी मिळून
वृक्षारोपण केले व सदरील वृक्षांची जोपासना करण्याची शपथ घेतेली. या नंतर विद्यार्थी सहाय्यक समितीच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख कुमारी अंगारिका मांडे यांनी विद्यार्थ्यांना लर्निंग एटीट्यूड या बद्दल संस्थेमधील विद्यार्थी व उन्हाळी संस्कार शिबिरात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच अल्फा बाईट येथील विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन केले.या प्रसंगी संस्थेचे खजिनदार मा. श्री. तुषार रंजनकर सर, शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख मा. श्री. महादेव चव्हाण सर, शंकरराव पाटील कोपिवाराची शाळा अभ्यासवर्ग चे प्रमुख श्री. भारत बोराटे सर, संस्थेचे सल्लागार व सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. हमीद भाई आतार, उन्हाळी संस्कार शिबिराचे प्रमुख श्री. संतोष नरुटे सर, संस्थेचे इन्चार्ज दिपक जगताप, जावेद हबीब अकॅडेमी चे प्रमुख अमोल राउत, कर्मचारी पूजा जाधव, त्रिशला पाटील, अख्तर शेख, अभिजित साळुंके, प्रीती खरात व संस्थेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.